ठेंगोडा ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे उद्घाटन
ठेंगोडा ग्रामपंचायत येथे 17 सप्टेंबर 2025 रोजी विशेष ग्रामसभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. या अभियानाची अंमलबजावणी 31 डिसेंबर 2025 पर्यंत होणार असून सेवा पंधरवडा, स्वच्छता ही सेवा यांसारख्या उपक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामपंचायतीने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस संकल्प व्यक्त केला आहे.

ठेंगोडा ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे उद्घाटन
दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी ठेंगोडा ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे उद्घाटन विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून करण्यात आले. हे अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ग्रामसभेत सेवा पंधरवडा, स्वच्छता ही सेवा तसेच लोकसहभागावर आधारित विविध उपक्रमांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी 100 गुणांची पत्रिका वाचन करून गावात करावयाच्या कामांचे नियोजन निश्चित करण्यात आले. या माध्यमातून ठेंगोडा ग्रामपंचायतने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलण्याचा संकल्प केला असून, अभियानातील बक्षीस जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.